Breaking News

हॉटेल तुळजाई व बजरंग दलाच्या वतीने आदर्श शिक्षक व खेलरत्न पुरस्कार प्रदान

बुलडाणा, दि. 13, सप्टेंबर - शहरातील नांदुरा रोडवरील हॉटेल तुळजाई व बजरंग दलाच्यावतीने सायं. 6 वा.श्रीराम आदर्श शिक्षक पुरस्कार तर क्रीडा क्षेत्रातील  व्यक्तीस श्रीराम खेल पुरस्काराचे वितरण मोठया उत्साहात पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीपाद् कोल्हटकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राम देशमुख जळगाव  जा. हे होते तर उपस्थितांमध्ये बजरंगदलाचे विदर्भ प्रांत संयोजक अ‍ॅड. अमोल अंधारे, महिला महाविद्यालयाचे प्रा. डॉ.वसंत डोंगरे, मातृशक्ती जिल्हा संयोजिका सौ.  कोरडेताई मंचावर विराजमान होते. 
कार्यक्रमामध्ये मान्यवरांनी आपले पुरस्कार संदर्भात शिक्षकांची पूवीर्ची व आताची बदललेली जीवनशैली या विषयावर सविस्तर विवेचन केले.साने गुरुजी गेले परंतु  आता नाने गुरुजी आले. विद्यार्थी हे गुरुच्या गुरुकुलमध्ये तयार होणारे भावी पिढीचे भविष्य आहेत, असे डॉ.राम देशमुख यांनी सांगितले.
या कार्यक्रमामध्ये मान्यवरांच्या हस्ते श्रीराम आदर्श शिक्षक पुरस्कार सुरेश लक्ष्मण राऊत, सौ.अनुजा दीपक महाजन, सिताराम झिप्राजी तायडे, वसंत भिमराव  खंडागळे यांना तर खेलरत्न पुरस्कार अनिल श्रीराम मुलांडे यांना प्रदान करण्यात आला. मागील 4 वषार्पासून दरवर्षी विहिंप व बजरंगदलाच्यावतीने देण्यात येणारा हा  पुरस्कार मोलाचा असल्याच्या प्रतिक्रीया पुरस्कार प्राप्त शिक्षकांनी कार्यक्रमादरम्यान व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे संचालन सौ. अंध्याल मॅडम यांनी तर प्रास्ताविक  राजेंद्रसिंह राजपूत यांनी केले. आभार प्रदर्शन सचिन तांदुळकर यांनी केले.  कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.