Breaking News

आरबीआयची पैशासंदर्भातली आकडेवारी खोटी - अनिल बोकील

पुणे, दि. 01, सप्टेंबर - मोदी सरकारने घेतलेला नोटबंदीचा निर्णय हा काळ्या पैशापेक्षा बँकिंग क्षेत्राच्या दुरुस्तीसाठी होता. या निर्णयाचे परिणाम दिसायला वेळ  लागणार आहे. चिंदबरम आणि मनमोहन सिंग यांनी काळ्या पैशाबद्दलची जी आकडेवारी सांगितली आहे, ती वेगळी आहे. बँकेने जी आकडेवारी सरकारकडे सादर  केली आहे ती खोटी असून खरी आकडेवारी लवकरच बाहेर येईल, असे अनिल बोकील यांनी सांगितले आहे.
मुळातच काळ्या पैशाबद्दल ही नोटाबंदी नसुन दहशतवाद, निवडणूक, कर चुकवेगिरी या सर्वांना चाप लावण्यासाठी हा निर्णय होता. कर चुकवणार्‍यांनी नोटाबंदीनंतर  कर भरुन पैसा पांढरा केला. नोटाबंदीच्या काळात खोट्या नोटाही आल्या आहेत. त्या नोटा रिझर्व्ह बँक समोर आणु शकत नाही, असेही बोकील म्हणाले.