Breaking News

शिक्षक दिनी राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्याकडून डॉ. राधाकृष्णन यांना आदरांजली

नवी दिल्ली, दि. 06, सप्टेंबर - शिक्षक दिनाच्या निमित्ताने राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून देशाचे दुसरे राष्ट्रपती डॉ.  सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या स्मृतींना अभिवादन केले आणि देशभरातील शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.
शिक्षक दिनाचे औचित्य साधून मी डॉ. राधाकृष्णन यांच्या स्मृतींना वंदन करतो आणि देशातील सर्व शिक्षकांना शुभेच्छा देतो, असे ट्विट राष्ट्रपती कोविंद यांनी केले  आहे.
नव्या भारताच्या (न्यू इंडिया) निर्माणाच्या स्वप्नात शिक्षक वर्गाची भूमिका महत्वाची आहे. ज्ञानदानाचे महान कार्य करणा-या आणि खेळमेळीच्या वातावरणात  देशातील लहान मुलामुलींना शिकवणा-या शिक्षकांना मी सलाम करतो. तसेच, डॉ. राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करतो,  असे ट्विट पंतप्रधान मोदी यांनी केले आहे.