एअर इंडियाचे विमान धावपट्टी वरून घसरले, प्रवासी सुखरूप
नवी दिल्ली, दि. 06, सप्टेंबर - अबुधाबीहून कोच्चीला आलेल्या एअर इंडियाचे विमान मंगळवारी धावपट्टी वरून घसरले. विमानाचे मागील चाक विरूद्ध दिशेला वळले त्यामुळे विमान उतरवल्यावर पार्किंग क्षेत्रात जाताना त्याचे पुढील चाक निघाले. परिणामी विमान घसरले. मध्यरात्री 2 वाजून 39 मिनिटांनी ही घटना घडली. विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित असल्याचे विमानतळावरील सूत्रांकडून सांगण्यात येते.
