Breaking News

दहशतवादी हल्ल्यातील शहीदाच्या मुलीच्या शिक्षणाचा खर्च गौतम गंभीर उचलणार

नवी दिल्ली, दि. 06, सप्टेंबर - जम्मू काश्मीरमधील अनंतनागमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यांत शहीद झालेले सहायक उपनिरीक्षक अब्दुल रशीद यांची मुलगी जोहरा  हिच्या शिक्षणाचा खर्च क्रिकेटपटू गौतम गंभीर उचणार आहे. त्याने याबाबतची माहिती ट्विटच्या माध्यमातून दिली आहे.
झोहरा, मी अंगाई गाऊन तुला जोजवू शकत नाही. मात्र, तुझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी मदत करणार आहे. तुझ्या शिक्षणाचा पूर्ण खर्च मी उचणार आहे, असे ट्विट  गंभीरने केले आहे. यापूर्वी एप्रिल महिन्यात सुकमा जिल्ह्यात झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलातील जवानांच्या कुटुंबियांसाठीही  गंभीरने मदतीचा हात पुढे केला होता. त्याने 25 शहीद जवानांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलणार असल्याचे सांगितले होते. आपल्या गौतम गंभीर फाऊंडेशनतर्फे  हा खर्च केला जाणार असल्याचे जाहीर केले होते.