Breaking News

चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत जाहीर

मुंबई, दि. 30, सप्टेंबर -  एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकाच्या पुलावरील चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना राज्य सरकारने 5 लाख रुपयांची तर  रेल्वेने 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली. राज्य सरकारकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर रेल्वेकडून रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी ही मदत जाहीर केली  आहे. याशिवाय गंभीर जखमींना 1 लाख रुपये तर किरकोळ जखमींना 50 हजार रुपयांच्या मदतीची घोषणा रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी केली आहे. तसेच सर्व  जखमी नागरिकांवर मोफत उपचार केले जातील अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.