Breaking News

बिस्किटांच्या पुड्यात किड निघाल्यामुळे पार्ले कंपनीला दंड

ठाणे, दि. 30, सप्टेंबर -  कीड लागलेला बिस्किटांचा पुडा विकल्याप्रकरणी ग्राहक न्यायालयाने पार्ले कंपनीला ग्राहकाला 35 हजार रुपये देण्याचे आदेश दिले  आहेत. पार्ले कंपनसह किरकोळ विक्रेत्यालाही दंडाची रक्कम ग्राहकाला द्यावी लागणार आहे. गेल्या आठवड्यात मोहम्मद झुबेर शेख यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे  ठाणे अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने हे आदेश दिले आहेत.
नवी मुंबईतील सीबीडी बेलापूरमधून तक्रारदाराने 25 रुपयांचा पार्ले-जी बिस्किटांचा पुडा घेतला होता. पुड्यातील बिस्किटांना कीड लागल्याचा दावा शेख यांनी  केला. पुड्यावर जानेवारी 2015 ही पॅकेजिंग डेट असून एक्स्पायरी डेट दिसत नसल्याचे त्यांना आढळले. वैद्यकीय तपासणीत बिस्किटाच्या पुड्यात लार्व्हा आणि  कॉबवेब असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ही बिस्किटं खाण्यास धोकादायक असल्याचं सांगत ग्राहक मंचाने हा निकाल दिला.