Breaking News

लडाखमध्ये लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले; चालक, सर्व सहकारी सुखरूप

लेह, दि. 06, सप्टेंबर - जम्मू-काश्मीरमधील लडाखमध्ये लष्कराचे हेलिकॉप्टर आज दुपारी कोसळले. मात्र सुदैवाने चालक व त्याचे सर्व सहकारी सुखरूप  असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातग्रस्त हेलिकॉप्टरमध्ये लेफ्टिनेंट जनरल एस. के. उपाध्याय आणि कमांडर मेजर जनरल सवनीत सिंग हे दोन वरिष्ठ अधिकारी  होते. अपघाताचे कारण अद्याप समजले नसल्याचे अधिका-यांनी सांगितले.