‘डेरा सच्चा सौदा’ च्या मुख्यालयातून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त
सिरसा, दि. 06, सप्टेंबर - राम रहीम यांच्या सिरसा येथील ‘डेरा सच्चा सौदा’ आश्रमाच्या मुख्यालयातून पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त केला आहे.हरियाणा पोलिसांना आश्रमाच्या मुख्यालयात रायफल्स आणि जिवंत काडतुसे सापडली . आश्रमात हत्यारांचा साठा का करण्यात आला, याचीही चौकशी पोलीस करीत असून मोठ्या प्रमाणावर जप्त करण्यात आलेल्या शस्त्रसाठ्यांमुळे पोलीस देखील आश्चर्य व्यक्त करत आहेत.
आश्रमामध्ये परवाना असलेली शस्त्रे बाळगणा-यांना ती जमा करण्याचे आदेश पोलिसांनी दिल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. आतापर्यंत पोलिसांनी 33 शस्त्रे जप्त केली असून ज्यांनी शस्त्रे जमा केलेली नाहीत अशा व्यक्तींविरोधात कारवाई करण्यात येणार आहे.
25 ऑगस्ट रोजी पंचकुलाच्या केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष न्यायालयाने बलात्कारप्रकरणी बाबा राम रहिम याला दोषी ठरवले होते. त्यानंतर 27 ऑगस्ट रोजी त्याला बलात्काराच्या दोन प्रकरणांमध्ये 20 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली. बाबा राम रहिम सध्या रोहतकच्या सुनारिया कारागृहात शिक्षा भोगत आहे.