Breaking News

समाज माध्यमांवरील पत्रकारांचा आवाज दडपण्याच्या हालचाली -मुंडे

मुंबई, दि. 23, सप्टेंबर - समाज माध्यमांवर मते व्यक्त करणार्‍या पत्रकारांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न सरकारकडून चालू आहे असा आरोप विधान परिषदेतील  विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केला.
समाज माध्यमांवर मते व्यक्त करणार्‍या काही पत्रकारांना पोलिसांच्या सायबर गुन्हे विभागाकडून नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर श्री . मुंडे यांनी  आपली मते ट्विट करून व्यक्त केली आहेत.
ते म्हणाले की अशा पद्धतीने नोटिसा पाठविणे ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आहे. विरोधी आवाज दाबण्याचे हे प्रयत्न पाहिले की आणीबाणीची चाहूल लागते  आहे. मात्र अशा पद्धतीने विरोधी आवाज दाबण्याचे कितीही प्रयत्न झाले तरी सरकारच्या कारभाराविषयीचा असंतोष दाबून राहू शकणार नाही . पत्रकारांना पोलीस  ठाण्यात बोलावून धमकावण्यापेक्षा सरळ आणीबाणी जाहीर करा , असेही मुंडे यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे.