Breaking News

अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन सामूहिक बलात्कार

पुणे, दि. 30, सप्टेंबर -  शाळेमध्ये निघालेल्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिला आळंदीच्या लॉजवर नेऊन तिच्यावर दोघांनी बलात्कार केला.  ही धक्कादायक घटना काल (दि.28) सकाळी साडेसात ते साडेअकराच्या दरम्यान घडली. याप्रकरणी पोलिसांनी महेश बिडवे (वय 23 रा. गंगानगर) याला अटक  केली असून त्याचा साथीदार फऱार आहे.सांगवी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिडीत मुलगी व आरोपी यांची फेसबुकवर ओळख झालेली होती. त्यांच्यामध्ये गेल्या  वर्षभरापासून मैत्री होती. काल, गुरुवारी पिडीत मुलगी महाविद्यालयात निघाली असताना आरोपी कारमधून आला व तिला फिरायला येण्यासाठी विचारले. मुलीने  नकार दिला असता आरोपीने शिवाजीनगरपर्यंत तिचा पाठलाग केला. तिचा हात धरून तिला जबरदस्ती कारमध्ये बसवेले. तिला त्याने आळंदीच्या एका लॉजमध्ये  नेले व तेथे आरोपी व त्याच्या साथीदाराने तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपी महेश बिडवे याला अटक केली  असून त्याच्या साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत. आरोपीवर बलात्कार, अपहरण व बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. याचा पुढील तपास सांगवी  पोलीस करत आहेत.