Breaking News

स्वच्छ ऊर्जेवरील दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेला सुरुवात

सोलापूरे, दि. 30, सप्टेंबर - प्राचीन भारतात स्वच्छ ऊर्जा वापराचे ज्ञान होते. मात्र औद्योगिकीकरण आणि ऐषोरामासाठी आपण त्यापासून खूप दूर गेलो आहोत. स्वच्छ ऊर्जेचे पर्याय स्वीकारून कार्बनचे कमी उत्सर्जन करणारी निसर्गाशी अनुकूल जीवनप्रणाली आपण स्वीकारायला हवी, यातूनच विकसित भारत घडू शकेल, असे मत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भारुड यांनी व्यक्त केले. सोलापूर विद्यापीठातील सामाजिक शास्त्रे संकुलाच्या वतीने आयोजिण्यात आलेल्या ’स्वच्छ ऊर्जेचे भवितव्य’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार होते. याप्रसंगी तुर्कू विद्यापीठातील फिनलँड फ्युचर्स रिसर्च सेंटरचे संचालक प्रा. जुहा कसकीनेन प्रा. जिरकी लुकानेन, कोकण विभागाचे विभागीय आयुक्त जगदीश पाटील, सामाजिक शास्त्रे संकुलाचे संचालक प्रा. ई. एन. अशोककुमार उपस्थित होते. सामाजिक शास्त्रे संकुलातील सेंटर फॉर फोरसाईट स्टडीज आणि तुर्कू विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने ही परिषद होत आहे. सूर्या इंटरनॅशनल येथे ही परिषद आयोजिण्यात आली आहे.