Breaking News

महिलेचे अश्‍लिल छायाचित्र इंटरनेटवर अपलोड करणा-या युवकास अटक

सातारा, दि. 30, सप्टेंबर -  कोरेगाव येथील एका महिलेचे अश्‍लिल छायाचित्रे इंटरनेटवर अपलोड करणा-या अजित बबन भोसले रा, विद्यानगर, कोरेगाव याला  कोरेगाव पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. याबाबत महिलेने कोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली  होती. पोलिसांनी अजित भोसले याला अटक केली होती. त्याला न्यायालयात हजर केले असता, न्या. महेश शिलार यांनी 14 दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे  आदेश दिला.