Breaking News

सामाजिक संदेशाने होत आहे गणपतीची आरास

नाशिक, दि. 01, सप्टेंबर - शेतकरी आत्महत्या थांबवा, झाडे लावा झाडे जगवा, चिनी वस्तुवर बंदी घाला त्याचबरोबर दारू पळवा गाव वाचवा, व्यसन म्हणजे  गुलामगिरी, दारूने झिंगला संसार भंगला अशा प्रकारे सामाजिक संदेश देणारे देखावे यावर्षी खेडगाव परिसरात तयार आले आहे. दिंडोरी तालुक्यातील जउळके  वणीच्या संस्कृती प्रतिष्ठान आणि खेडगावच्या ईच्छापुर्ती परिवार मित्र मंडळांचे गणपती आणि देखावे गणेशभक्तांच्या आकर्षणाचा विषय बनले आहेत.
जउळकेचा तळयातळा गणपती--
संस्कृती प्रतिष्ठाणंडळाच्या वतीने दरवर्षी एक गाव एक गणपती हा उपक्रम राबवला जातो. या मंडळाने अभूतपूर्व असे पाण्यावर गणेश मंदिर तयार केले आहे. यामध्ये  पाच फुटी बाप्पाच्या मुर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. बसवण्यात आलेला हा बाप्पा तळयाच्या मधोमध आहे. दर्शनाला जाण्यासाठी तारेच्या जाळीचा पुल बनविण्यात  आला आहे. त्यामुळे पंचक्रोशीतील भाविकांचे आकर्षण बनले आहे. हा गणपती वणी- पिंपळगाव महामार्गावर असल्याने हजारो भाविकांनी येथे दर्शनाला हजेरी लावली  आहे. तर पुढील काळात पाच ते सहा हजार भाविक येणार असल्याचे मंडळाच्या पदाधिका-यांकडून सांगण्यात आले आहे. तसेच गणपतीची मिरवणुकीवर आणि दहा  दिवसात होणारा अनावश्यक खर्च टाळून गावातच सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहे.
खेडगावचा दारूबंदीचा गणेश
प्रत्येक वर्षी वेगवेगळा देखावा करण्यासाठी खेडगावचे ईच्छापुर्ती परिवार मंडळाची ख्याती आहे. दारूबंदीसाठी खेडगावकरांनी एकजूट केल्याने यंदा दारूबंदीची आरास  करण्यात आली आहे. दारूने माणूस कसा खंगत जाते हे पुतळयांच्या साहयाने दाखवून देण्यात आले आहे. खेडगाव आणि परिसरात मागील काही दिवसात अनेक  तरूण दारूच्या व्यसनाने मृत्यूमुखी पडले आहे. त्यामुळे सबंध गावक-यांनी दारू दुकान सुरू ठेवण्याला कडाडून विरोध केला आहे. नेमका हाच धागा पकडून खेडगा  होण्यासाठी हा खेडगावमध्ये दारूबंदीसाठी मतदान घेण्यासाठी महिलांचे प्रबोधन होण्यासाठी हा देखावा तयार करण्यात आला आहे. गाभा-यात आठ फुटी मुर्तीची  स्थापना करण्यात आली आहे. यावेळी गाव जेवणाची व्यवस्था करण्यात येते. त्याचा लाभ सर्वानी घेण्याचे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे.