Breaking News

राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये डॉ. आंबेडकरांचा पुतळा उभारण्याची मागणी

औरंगाबाद, दि. 01, सप्टेंबर - भारिप बहुजन महासंघ प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतिने आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरुं  डॉ. बी.ए. चोपडे यांना महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात यावा असे निवेदन देण्यात आले. या निवेदनाची प्रत  मुख्यमंत्री तसेच राज्यपालांना पाठविण्यात आले. याबरोबरच कुलगुरुंनी मुख्यमंत्री आणि राज्यपालांशी याबाबत चर्चा करुन यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी प्रयत्न  करावेत अशी मागणी या निवेदनामार्फत सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश इंगळे यांच्या नेतृत्वामध्ये करण्यात आली. या निवेदनावर मनिष इंगळे,  अमरदीप वानखडे, सिद्धार्थ मोरे, अक्रम खान, अण्णासाहेब सोनोवने, अमोल घुगे, अभिजीत वानखडे, राहुल खंदारे, पवन साळवे, आकाश गायकवाड, रवि इंगळे,  रामाप्रसाद वाव्हळ, भास्कर निकाळजे, नितिन गव्हांदे, रवि गवई, व. डि. एन. बोदडे, भिमराव वाघमारे, संघर्ष साळवे, चेतन शिंदे, राहुल कांबळे, भिमराव शिरसाठ,  निलेश आरके, शे. मुजम्मिल, अनिल दिपके, राहुल पंडित, सुनिल वाघमारे, उमेश वाघ, अजिंक्य अवसरमोल, गणेश पानझाडे, आदिंच्या सह्या आहेत.