सरसंघचालक भागवत यांच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारल्याचा निषेध
कोलकाता, दि. 06, सप्टेंबर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या 3 ऑक्टोबर रोजी होणा-या कार्यक्रमासाठी सभागृह उपलब्ध करू न देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचा रा.स्व. संघाकडून निषेध करण्यात आला आहे.
भगिनी निवेदिता मिशन ट्रस्टच्या वतीने 3 ऑक्टोबर रोजी भागवत यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी कोलकातामधील महाजाती सदनातील सभागृह आरक्षित करण्यात आले होते. हे सभागृह राज्य सरकारच्या मालकीचे आहे. मात्र अचानक सभागृहाच्या व्यवस्थापनाने भागवत यांच्या कार्यक्रमाचे आरक्षण रद्द केल्याचे कार्यक्रमाच्या आयोजकांना कळवले. सभागृहाच्या नूतनीकरणाचे काम करायचे असल्याने या कार्यक्रमाला दिलेली परवानगी रद्द करण्यात येत आहे, असे आयोजकांकडून सांगण्यात आले. सभागृहाचे आरक्षण रद्द केल्याप्रकरणी उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचे ट्रस्टच्या वतीने सांगण्यात आले आहे.
मात्र रा.स्व. संघाचे कार्यक्रम होऊच द्यायचे नाही अशी ममता बॅनजी सरकारची भूमिका असल्याने भागवत यांच्या कार्यक्रमाला हेतूपूर्वक सभागृह उपलब्ध होऊ दिले जात नाही असा आरोप केला जात आहे.