कोलकातामध्ये इमारत कोसळून तिघांचा मृत्यू
कोलकाता, दि. 06, सप्टेंबर - येथील बुरा बाजार भागातील इमारत कोसळली असून त्यात तिघांचा मृत्यू झाला. तर काही जण गंभीर जखमी झाले आहेत. ताराप्रसन्ना साहा, शोभा रानी साहा आणि ब्यूटी रॉय अशी मृतांची नावे आहेत. घटनास्थळी कोलकाता महापालिकेच्या कर्मचा-यांकडून बचावकार्य सुरू करण्यात आले असून मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इमारत कोसळल्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. कोलकाता महापालिकेने या इमारतीला धोकादायक इमारत म्हणून घोषित केले असतानाही नागरिक या इमारतीत राहत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
