Breaking News

वैद्यकीय क्षेत्रामुळे अर्थव्यवस्थेस बळकटी

माजी कृषीमंत्री शरद पवार यांचे हस्ते मॅक्सकेअर हॉस्पिटलचे उद्घाटन 

अहमदनगर, दि. 25, सप्टेंबर - वैद्यकीय व शैक्षणिक क्षेत्र फक्त संधीच निर्माण करत नाही  तर अर्थव्यवस्थेस बळकटी देण्याचे काम करतात.अर्थव्यवस्था भक्कम  करण्यात  वैद्यकीय सेवा मोलाची भर टाकत असतात. आजचा तरुण ग्रामीण भागातून येऊन वैद्यकीय क्षेत्रात भरारी घेऊ पाहत आहे ही अभिमानाची  गोष्ट  आहे.वैद्यकीय क्षेत्रामुळे रुग्ण सेवा तर होतेच त्याबरोबर अर्थव्यवस्थाही  बळकट होते असे प्रतिपादन मा.शरदचंद्रजी पवार यांनी केले.नगर शहरातील मॅक्स केअर  हॉस्पिटलच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. हॉस्पिटलचे उदघाटन पवार साहेबांच्या हस्ते झाले.यावेळी विरोधी पक्षनेते ना.राधाकृष्ण विखे  पाटील,मा.अर्थमंत्री जयंत पाटील,पालकमंत्री राम शिंदे , मा.आ.पांडुरंग अभंग, आ.शिवाजी कर्डीले,आ.अरुण काका जगताप,मा.चंद्रशेखर घुले,राजश्रीताई  घुले,मा.दादाभाऊ कळमकर,महापौर  सुरेखाताई कदम ,उपमहापौर श्री. छिंदम,मॅक्स केअर हॉस्पिटलचे सर्व संचालक डॉकटर आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना पवार म्हणाले आजच्या तरुण वर्गाने शेतीमधून बाहेर पडले पाहिजे.आज शेतीचे क्षेत्र कमी होत चालले आहे.शेतजमिनीवर धरणे,कारखाने,महामार्ग  झाले,जमिनीचे धारणक्षेत्र कमी झाले .त्यामुळे आज कुटुंबातील एका व्यक्तीने शेती बाहेर पडून इतर क्षेत्रामध्ये प्रगती करावी म्हणजे त्याच्या कुटुंबाची प्रगती  होईल.मॅक्स केअर मधील डॉकटर शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे ते नक्कीच उत्तम प्रकारे जनसेवा करतील असा विश्‍वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.डॉकटर आणि  रुग्ण यांच्या मध्ये विश्‍वासाचे नाते निर्माण झाले पाहिजे .असे झाले तरच रुग्णांना डॉक्टरांविषयी आस्था वाटेल,असा सल्लाही यावेळी त्यांनी दिला.
या प्रसंगी बोलताना जयंत पाटील म्हणाले ,अत्याधुनिक सेवा नगरमध्ये उपलब्ध झाल्याने आनंद होत आहे. डॉक्टरांचा   गोतावळा खूप मोठा आहे.परंतु मोठ्या  गोतावळ्यापेक्षा नागरकरांचा मोठा विश्‍वास डॉक्टरांनी हस्तगत करावा.
पालकमंत्री राम शिंदे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले आज अवयवदान ही संकल्पना मोठे स्वरूप घेत आहे.व ही अभिमानाची गोष्ट आहे.वैद्यकीय क्षेत्राने यास  चळवळीचे स्वरूप प्राप्त करून द्यावे म्हणजे अनेकांना जीवनदान मिळेल.मॅक्स केअर हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी रुग्णांना वाचवण्यासाठी कष्टाची पराकाष्टा करावी व  हीच खरी जनसेवा ठरेल.
या  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद बेडेकर यांनी केले तर प्रास्ताविक डॉ.सतिष सोनवणे यांनी केले.