Breaking News

शिक्षणाची ज्योत कानाकोपर्‍यात नेण्यासाठी कर्मवीरांची पराकाष्ठा-पवार

राधाबाई काळे महाविद्यालयाच्या प्रशासकीय इमारतीचे उदघाटन

अहमदनगर, दि. 25, सप्टेंबर - आपल्या आयुष्यात कर्मवीर अण्णांनी शिक्षणासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. त्यांनी शिक्षणाची ज्योत महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात  नेण्यासाठी काम केले. त्यांच्या योगदानाचा लाभ आपण घेत आहोत, अण्णांचा विचार समाजात रुजविला तर समाजात परिवर्तन होईल, असे प्रतिपादन राष्ट्रवादी  काँग्रेसचे अध्यक्ष व  रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. पवारांच्या हस्ते रविवारी येथील राधाबाई काळे महाविद्यालयात पद्मभूषण कर्मवीर भाऊराव  पाटील यांची 130 जयंती तसेच महाविद्यालयाच्या प्रयोगशाळाव प्रशासकीय इमारतीचे उदघाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते, अध्यक्षस्थानी रयत शिक्षण  संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील होते.
कार्यक्रमास विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, आमदार अरूण जगताप, ज्येष्ठ नेते दादाभाऊ कळमकर, अंकुशराव काकडे. आमदार संग्राम जगताप,  राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले, अशोकराव काळे, बबनराव पाचपुते,रयतचे अरुण कडू, रयतचे उपाध्यक्ष अ‍ॅड.  भगिरथ शिंदे,सचिव भाऊसाहेब  काळे,मीनाताई जगधने, राजेंद्र फाळके आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना पवार म्हणाले, कर्मवीर अण्णांचे  कर्त्तत्व, दृष्टी, योगदान याबद्द्ल मी काही अधिक सांगण्याची गरज नाही,  वर्षानुवर्षे त्यांच्या योगदानाचा  लाभ  आपण घेत आहोत, अण्णांनी महाराष्टात कोनाकोपर्‍यात शिक्षणाची ज्योत पोहचविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली. जे जिल्हा त्यांच्यामागे उभे राहिले, त्यात क्रमांक  एकचा जिल्हा म्हणजे नगर जिल्हा. या जिल्ह्यातील अनेकांनीं अण्णांना साथ दिला.त्यात पी.के. भापकर,हिराबाई भापकर यांचा समावेश आहे. हिराबाई भापकर या  त्यावेळी लोकल बोर्डाच्या  अध्यक्ष होत्या. त्यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण भागात तरुणपपिढीसाठीज्ञान देण्याचे काम झाले. अण्णांना साथ पद्मश्री विखे पाटील,  शंकरराव काळे, रावसाहेब म्हस्के, रावसाहेब शिंदेचे आदी नेत्यांची साथ मिळाली. या नेत्यांनीं आपल्या आयुष्यातील मोठा काळ अण्णांच्या विचारांच्या  अंमलबजावणीसाठी दिला. रयत शिक्षण संस्थेच्या  विस्तारासाठी शंकरराव काळे व रावसाहेब यांनी  तर काम केलेच परंतु संस्थेचा इतर जिल्ह्यात  विस्तार, दर्जा  वाढविण्याची  खबरदारी  घेतली. म्हणून रयतचे व जिल्ह्याचे वेगळे नाते आहे. या चळवळीतून दर्जेदार शिक्षण देणार्‍या संस्था तयार झाल्या. लोक तयार झाले.  अण्णांच्या विचाराची अंमलबजावणी करताना त्यांनी आपणास  दृष्टी दिली. आमविश्‍वास दिला. समाजासाठी काम करण्याची दिशा दिली. हा विचार आपण आपल्या  व्यक्तिगत जीवनात राबविला तर समाजात परिवर्तन होईल. हे होत  असताना मुली चांगल्या पद्धतीने काम करू शकतात, असे मला वाटते असे सांगून पवार यांनी  मुलीबाबत पहिले धोरण मुख्यमंत्री असताना राबविले. त्यानंतर पाच वर्षात संसदेत निर्णय घेतला गेला. जिल्हा परिषद, ग्रामपंचायत  मध्ये 50 टक्के जागा महिलांना  देण्याचा निर्णय आम्ही घेतला. लष्करात महिलांना संधी देण्यासाठी 11 टक्के  आरक्षण निर्णय घेतल्याचे पवार यांनी सांगितले.
पवारांच्या चळवळीचे मूळ रयतमध्ये
रयत  आणि पवारांचे यांचे नातेही त्यांनी स्वतःच्या भाषणातून मिश्किलपणे उलगडून दाखविले. पवार म्हणाले. मी नववीला नगर जिल्ह्यात रयतच्या शाळेत होतो.पण  तेथे आम्ही उद्योग केला. संप  केला. त्याचा परिणाम म्हणून आम्हाला आई-वडिलांनी पुन्हा बारामतीला आणले. पण आमचा उद्योग कमी न होता विस्तारत गेल्याचे  सांगत ते म्हणाले, पुणे महाविद्यालयात चळवळीचे काम केले. त्यातून मी पुढे जात राहिलो, विधानसभेत गेलो, मुख्यमंत्री झालो.देशाच्या पार्लमेंटमध्ये गेलो.  राजकीय  जीवनातील 50 वर्षाचा विक्रम माझ्याकडून झाला.  त्याचा  पाया अर्थातच रयतचे शिक्षण असे ते म्हणाले.
पवार आणि विखे यांची गुप्त बैठक
राधाबाई काळे महाविद्यालयात आज शरद पवार कार्यक्रमासाठी आले असता त्याठिकाणी विधानसभेचे विरोधीसभेचे पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांची भेट  घेतली. महाविद्यालयाच्या एका चेंबरमध्ये पवार आणि विखे यांच्यात सुमारे पंधरा मिनिटे गुप्त चर्चा झाली. नारायन राणे यांनी पक्ष सोडल्यानंतर झालेली बैठक ही  महत्वाची मानली जाते.