Breaking News

माजी लष्करप्रमुखांची विशेष बैठक; डोकलाम वाद, लक्ष्याभेदी हल्ल्यावर होणार चर्चा

नवी दिल्ली, दि. 06, सप्टेंबर - लष्करप्रमुख बिपीन रावत यांच्या अध्यक्षतेखाली 7 सप्टेंबरपासून देशाच्या माजी लष्करप्रमुखांच्या 3 दिवसाच्या विशेष बैठकीचे  आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत बहुचर्चित डोकलाम वाद आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय लष्कराकडून करण्यात आलेल्या लक्ष्याभेदी हल्ल्याबाबत  माजी लष्करप्रमुखांना माहिती देण्यात येणार आहे.
लष्करप्रमुखांच्या या परिषदेत त्यांचे 10 सहकारीदेखील उपस्थित असणार आहेत. लष्करी कारवाईतील व गुप्तचर विभागातील महत्वाचे अधिकारी डोकलाम वाद  आणि लक्ष्याभेदी हल्ल्यासंदर्भात माजी लष्करप्रमुखांना माहिती देणार आहेत. तसेच या संदर्भात भविष्यात काय उपाययोजना करता येऊ शकतील, यावर माजी  लष्करप्रमुखांची मते मागितली जाणार आहेत, अशी माहिती माजी लष्करप्रमुख जे जे सिंग यांनी दिली.