Breaking News

मांजरा - धनेगाव धरणाचे दरवाजे उघडले

लातूर, दि. 22, सप्टेंबर - लातूर शहराला पाणी पुरवठा करणा-या मांजरा - धनेगाव धरणाचे आज सकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी सहा दरवाजे उघडण्यात  आले आहेत . काल रात्रीपर्यंत मांजरा धरणात 99 टक्के टक्के पाणी साठा झाला होता. धरणाच्या कार्यक्षेत्रात पाऊस सुरू असून पाण्याची आवक वाढत असल्याने  पाण्याचा 148 क्युसेक एवढा विसर्ग सुरू करण्यात आला आहे त्यानंतर पाणी आवक सुरूच होती त्यामुळे धरणाची दारं उघडण्याचा निर्णय घेण्यात आला. धरणाची  साठवण क्षमता 224 दश लक्ष घनमीटर इतकी आहे. रात्रीपर्यंत 212 दश लक्ष घनमीटर पाणी साठा धरणात झाला होता. .या मुळे मराठवाडयात ब-याच वर्षांनंतर  अनेक गावापर्यंत पाणी पोहोचले आहे. हे धरणा भरल्याने लातूर शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटणार आहे. प्रेासनाने मांजरा नदी काठच्या गावांना तीन दिवसपूर्वी  दक्षतेच इशारा देण्यात आला होता.धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याने मांजरा नदी काठच्या गावांना परत सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.