Breaking News

अजित पवार, सुनील तटकरे करणार कार्यकर्त्यांचे समुपदेशन

सोलापूर, दि. 23, सप्टेंबर - शहर-जिल्हाराष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सोलापुरात गुरुवारी (28) शहर, जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला आहे.  मेळाव्यास विधिमंडळाचे पक्षनेते अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे मार्गदर्शन करणार असून सकाळच्या सत्रात शहरातील तर दुपारच्या सत्रात  ग्रामीणमधील कार्यकर्त्यांचा मेळावा होणार असल्याची माहिती शहराध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष संतोष पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. गुरुवारी सकाळी वाजता  हुतात्मा स्मृती मंदिरात शहराचा मेळावा तर दुपारी वाजल्यापासून ग्रामीणचा मेळावा होणार आहे. या निमित्ताने युवक विद्या संघटना, महिला युवती  संघटना,अल्पसंख्याक, सामाजिक न्याय, ओबीसी इतर सेल, जिल्ह्यातील प्रमुख नेते मान्यवरांशी चर्चा करण्यात येणार आहे. जिल्हा प्रभारी जिल्हा निरीक्षक,  जिल्ह्यातील आजी-माजी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक होणार आहे. या बैठकीला नेते अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे मार्गदर्शन करणार  आहेत. कार्यकर्ता मार्गदर्शन, पक्षाची नव्याने बांधणी, पदाधिकार्‍यांच्या निवडी या विषयावरसुद्धा चर्चा होऊन पक्षसंघटनेतील रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया पूर्ण  करण्यात येणार आहे. पदाधिकारी निवडी नियुक्ती पक्षाच्या कार्यालयात होणार आहे. पत्रकार परिषदेला जिल्ह्याचे निरीक्षक प्रदीप गारटकर, माजी आमदार युन्नूस  शेख, मनोहर सपाटे, महेश गादेकर, दिलीप कोल्हे, पद्माकर काळे, प्रवीण डोंगरे, राजन जाधव, लता फुटाणे, मनीषा नलावडे, चंद्रकांत पवार, नगरसेवक किसन  जाधव, नागेश गायकवाड, सुनीता रोटे, सुवर्णा जाधव आदी उपस्थित होते. सोमवारी शहर राष्ट्रवादीची बैठक गुरुवारी होणार्‍या मेळावा तयारीसाठी सोमवारी सकाळी  11 वाजता आदित्य नगर येथील सुभद्राई जाधव सांस्कृतिक भवन येथे शहर राष्ट्रवादी काँग्रेसची तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे.या बैठकीला  राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कार्याध्यक्ष संतोष पवार यांनी केले आहे.