Breaking News

अंमली पदार्थ विकणारा नायजेरियन नागरिक ताब्यात

पुणे, दि. 23, सप्टेंबर - पुण्यात अंमली पदार्थांची विक्री करणार्या एका नायजेरियन नागरिकाला मुंढवा पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर त्याच्यावर हद्दपारी व  ब्लॅकलिस्टची कारवाई करत त्याला नायजेरिया येथे परत पाठविण्यात आल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली.एलिह क्रीस्टेन चिदीबेरे असे कारवाई करण्ल्या  नायजेरियन नागरिकाचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंढवा परिसरातील ए. बी. सी. रस्त्यावरील एका टपरीजवळ एक परदेशी नागरिक अंमली  पदार्थांची विक्री करत असावा अशी माहिती मुंढवा पोलिसांना त्यांच्या खास बातमीदारामार्फत मिळाली. त्यानुसार तपास पथकाचे पोलिस उपनिरीक्षक पी. एल. गिरी  व कर्मचार्यांनी त्या ठिकाणी सापळा लावला. त्यावेळी एका पानाच्या टपरीजवळ एक परदेशी नागरिक थांबलेला पोलिसांना दिसला. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी  केली असता तो नायजेरियन नागरिक असून तो पुणे शहरात अंमली पदार्थांची (ड्रग्ज) विक्री करत असल्याचे समोर आले.त्यामुळे मुंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ  पोलिस निरीक्षक अनिल पात्रुडकर यांनी सखोल चौकशी करून विशेष शाखा दोनचे पोलिस उपायुक्त व परकिय नागरिक नोंदणी अधिकारी पोलिस आयुक्त कार्यालय  यांच्याकडे त्याच्यावर हद्दपार व ब्लॅकलिस्टची कारवाई करण्याचा प्रस्ताव पाठवला. त्यानंतर त्याच्यावर ब्लॅकलिस्टची कारवाई करून शुक्रवारी नायजेरियात परत  पाठविण्यात आले.