Breaking News

खडसेंविरोधातील तक्रारी मागे घेण्यासाठी पाकिस्तानातून धमकी; अंजली दमानिया यांचा दावा

मुंबई, दि. 23, सप्टेंबर - भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या विरोधात पोलिसात केलेल्या तक्रारी मागे घेण्यासाठी आपल्याला धमकीचा फोन आला  असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. या प्रकरणी दमानिया यांनी वाकोला पोलीस स्थानकात तक्रार  दाखल केली आहे.
रात्री 12 वाजून 33 मिनिटांनी मला पाकिस्तानातून धमकीचा फोन आला होता. या फोनवरून मला खडसे यांच्या विरोधात केलेल्या तक्रारी मागे घेण्याची धमकी  देण्यात आली. हा फोन +92 2135871719 या क्रमांकावरून आला असून ‘ट्रू-कॉलर’ हा नंबर ‘दाऊद 2’ म्हणून सेव्ह करण्यात आला आहे, असे दमानिया  यांनी ट्विट केले आहे. या धमकीच्या फोन संदर्भात मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहिती दिली असल्याचेही दमानिया यांनी ट्विट करून स्पष्ट केले आहे.