Breaking News

भारतीय हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक ऑल्टमन्स यांची हकालपट्टी

नवी दिल्ली, दि. 03, सप्टेंबर - भारतीय हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक रोलॅन्ट ऑल्टमन्स यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षातील हॉकी  संघाची खराब कामगिरी पाहता त्यांना पदावरून दूर करण्याचा निर्णय घेण्यात आला. हॉकी इंडियाच्या समितीच्या बैठकीत शनिवारी हा निर्णय घेण्यात आला. सध्या  संघाच्या उच्च कामगिरी संचालकपदी असलेले डेव्हिड जॉन संघाचे हंगामी प्रशिक्षकपद भूषवणार असल्याची चर्चा आहे. ऑल्टमन्स हे 2013मध्ये उच्च कामगिरी  व्यवस्थापक म्हणून ‘हॉकी इंडिया’मध्ये रूजू झाले होते. परंतु, 2015मध्ये तत्कालीन मुख्य प्रशिक्षक पॉल वॅन स यांच्या नाट्यमय हकालपट्टीनंतर ऑल्टमन्स यांना  प्रशिक्षकपद देण्यात आले होते.