Breaking News

केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार

मुंबई, दि. 03, सप्टेंबर - केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला आहे. नव्या मंत्र्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शपथ दिली. या सोहळ्याला पंतप्रधान  नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक मंत्रीही उपस्थित होते.
एकूण 13 मंत्र्यांनी शपथ घेतली. ज्यामध्ये 4 राज्यमंत्र्यांना कॅबिनेट मंत्रिपदावर प्रमोशन देण्यात आले आहे, तर 9 नव्या मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे.  नव्या मंत्र्यांमध्ये 4 माजी अधिकारी आहेत. धर्मेंद्र प्रधान, निर्मला सीतारमन, पियुष गोयल, मुख्तार अब्बास नक्वी या राज्यमंत्र्यांना प्रमोशन मिळालं असून, त्यांची  कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागली आहे.