Breaking News

कांदिवली : अशोकनगर परिसरातील दुमजली इमारतीला आग

मुंबई, दि. 23, सप्टेंबर - कांदिवली पूर्व येथील अशोकनगर भागात बोनान्झा इंडस्ट्रीयल इस्टेट परिसरात शनिवारी सकाळी एका दुमजली इमारतीला अचानक आग  लागली. आगीची व्याप्ती मोठी असल्याने अग्निशमन दलाच्या आठ गाडया घटनास्थळी दाखल झाल्या. या ठिकाणाहून पाच जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात अग्निशमन  दलाला यश आले . आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या आगीत इमारतीमधील चार ते पाच दुकाने जळून खाक झाली आहेत. पण, सुदैवाने  जीवितहानी झालेली नाही. अग्निशमन दलाच्या गाड्याबरोबरच पाण्याचे सात टँकरही घटनास्थळी पाठवण्यात आले आहेत.