Breaking News

‘मेक इन इंडिया’ला तंत्रशुद्ध जोड देणार वेलिंगकर शैक्षणिक संस्थेचा नवा अभ्यासक्रम

मुंबर्ई, दि. 25, सप्टेंबर - मेक इन इंडिया या महत्वाकांक्षी योजनेला लागणारे नवउद्योजक तयार करण्याची जबाबदारी काही अंशी नामांकित वेलिंगकर शैक्षणिक  संस्थेने घेतली आहे. या संस्थेतर्फे (weschool)पोस्ट-ग्रॅज्युएट प्रोग्रॅम इन आंत्रप्रेन्युअरशिप (पीजीपी-आंत्रप्रेन्युअरशिप) हा अभ्यासक्रम सुरू केला असून हा  अभ्यासक्रम 11 महिन्यांचा असणार आहे. दोन सत्रांमध्ये हा अभ्यासक्रम विभागण्यात आला. या अर्धवेळ अभ्यासक्रमाची रचना आणि आराखडा हावर्ड बिझनेस  स्कूलच्या अभ्यासक्रमाच्या धर्तीवर तयार करण्यात आला आहे. . मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेचा पदवीधर या अभ्यासक्रमात सहभागी होऊ शकणार  असून प्रवेशासाठी अर्जाची मुदत 6 ऑक्टोबरपर्यंत आहे.
मेक इन इंडिया, स्टार्ट अप इंडिया या योजना लक्षात घेत पहिल्या व दुसर्‍या पिढीतील उद्योजक, ट्रेडिंग, किरकोळ विक्रेते, खानपान विभागातील उद्योजक, पर्यटन,  वाहतूक, निर्यात या क्षेत्रातील उद्योजक व उतपादकांना याचा विशेष फायदा होणार असल्याचा विश्‍वास समन्वयकांनी व्यक्त केला आहे.