Breaking News

नारायण राणेंबाबत आज निर्णयाची शक्यता

मुंबर्ई, दि. 25, सप्टेंबर - राज्याचे माजी मुख्यमंत्री व ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या भाजपमधील प्रवेशावर आज निर्णय होंण्याची शक्यता आहे. भाजप  कार्यकारिणीच्या बैठकीनंतर नारायण राणे हे अमित शाह यांची भेट घेणार आहेत. त्यावेळी त्यांच्या पक्षप्रवेशाबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. काँग्रेसने राणे यांनी  दिलेली आश्‍वासने न पाळल्याचे सांगत त्यांनी नुकताच काँग्रेसला रामराम ठोकला. गेल्या चार-पाच महिन्यांपासून राणे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरू  आहेत. परंतु, त्यांनी शिताफीने हे सारे नाकारले होते. पण आज राणे दिल्लीला अमित शाह यांच्या भेटीला गेल्यामुळे या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे. दिल्लीत आज  भाजप कार्यकारिणीची बैठक होणार आहे. त्यानंतर राणे-शाह भेट होणार असून या भेटीनंतर राणे काय घोषणा करतात, याकडे सा-यांचे लक्ष लागले आहे.