Breaking News

पत्रकाराच्या आत्महत्ये प्रकरणी एकास अटक

बीड, दि. 23, सप्टेंबर - गेवराई येथील पत्रकार जगदीश बेदरे यांच्या आत्महत्ये प्रकरणी माजी नगरसेवकासह अन्य एकावर गुन्हा दाखल झाला आहे. पत्रकार बेदरे  यांनी बुधवारी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यांच्या खिशात एक चिठ्ठी आढळुन आली होती. प्लॉट खरेदीविक्री  प्रकरणात माजी नगरसेवक दादासाहेब घोडके व कृष्णा मुळे यांना अनेकवेळा मागणी करूनही प्लॉट देत नव्हते त्यामुळे माझ्या भावाने आत्महत्या केली, अशी फिर्याद  जगदीश यांचा भाऊ अनिल बेदरे यांनी गेवराई पोलीस ठाण्यात दिली आहे. यातील कृष्णा मुळे याला अटक केली असून घोडके हा फरार आहे.