Breaking News

रोहिंग्यांसाठी जमाअत-इस्लाम-ए-हिंदचा मूक मोर्चा

औरंगाबाद, दि. 23, सप्टेंबर - म्यानमार येथे रोहिंग्या मुस्लिमांवर होणारे अत्याचार आणि मानवी अधिकाराच्या उल्लंघनाचा निषेध नोंदवण्यासाठी  जमाअत-ए-इस्लामी हिंदच्या वतीने आज शांती मोर्चा काढण्यात आला. दुपारी जामा मशिदीतील नमाजनंतर आमखास मैदान येथून या मोर्चास प्रारंभ झाला.  रोशनगेट पर्यंत मोर्चा नेण्यात आला. आज काढण्यात आलेला हा मोर्चामध्ये युवकांनी मोठया प्रमाणात आपला सहभाग नोंदविलेला आहे. तसेच म्यानमार घटनेचे  निषेध करणारे फलक त्यांच्या हाती होते. भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडु नयेत अशी त्यांची भावना होती. शहरातील सर्व धार्मिक, राजकीय, सामाजिक संघटना  सहभागी झाल्या आहेत. या वेळी जमाअतचे शहराध्यक्ष मौलाना इलियास फलाही, आमदार इम्तियाज जलील तसेच इलियास किरमाणी, मौलाना मोईजुद्दीन कासमी,  मौलाना मोईज फारुकी, साजेद रजा, एजाज जैदी, ऍड. फैज सय्यद, मौलाना महफूज फारुखी, मुबीन अन्सारी आदींची प्रमुख उपस्थिती होती.