Breaking News

अख्या गावचे मतदान बोली लावुन विकत घेणा-यावर गुन्हा दाखल

बीड, दि. 22, सप्टेंबर - बीड जिल्हयात एका गावात सरळ फिक्सींग करून सगळे मतदान विकत घेतल्याप्रकरणी सात जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला  आहे.निवडणूकीची धुराळी न उडवता जो गावाला जास्त पैसे देईल त्याला गावची सगळी मते देण्याचे नियोजन होते.
टकलेवाडी या गावची ही कथा आहे सरपंचपदासाठी इच्छुक उमेदवार तुकाराम तळतकर यांनी 5 सप्टेंबर रोजी मारुतीच्या मंदिरात सर्वोच्च बोली लावली व गावासाठी  म्हणून रक्कम दिली . दुसर्या दिवशी सप्टेंबर रोजी मसू टकले, नवनाथ सोलनकर, अशोक गव्हाणे, संदिप टकले यांच्या नावावर महाराष्ट्र ग्रामीण बॅक कोळगाव येथे 6  लाख 95 हजार रूपये एवढी रक्कम जमा केली होती. ही रक्कम गावातील 500 मतदानाच्या बदल्यात होती. मात्र उपसरपंच अशोक खरात यांनी निवडणूक विभागाकडे  या बाबत तक्रार केल्याने हे प्रकरण उघडकीस आले. तहसीलदार संजय पवार यांनी चौकशी केली त्यावरून सात जणांवर चकलांबा ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात  आला आहे.