Breaking News

वाळूचे 31 ट्रक जप्त; पाच कोटींचा माल जप्त

नांदेड, दि. 22, सप्टेंबर - अवैध वाळू वाहतूक करणा-या 31 ट्रकवर नांदेड पोलिसांनी कारवाई असून पाच कोटी रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर एकूण 93 ट्रक  चालक-मालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 
बिलोलीत आज पहाटे 4 च्या दरम्यान नांदेडच्या विशेष पोलीस पथकाने मांजरा नदी पात्रात धाड टाकूण 31 ट्रक ताब्यात घेतले. वाळू व ट्रक असा मिळून 5  कोटीचा मुद्देमाल जप्त केला. यावेळी पोलिसांनी 93 ट्रक चालक - मालकांविरोधात वाळू चोरीचा गुन्ह दाखल केला आहे.पोलिसांनी वाळू तस्करांना काहीही कल्पना  न येवू देता बरोबर मोठी कुमक घेवून सावधपणे एकाच वेळी धाड टाकल्याने आणि पुरेसा बंदोबस्त ठेवल्याने ट्रकचालकांना पळून जाण्याची किंवा कोणतेहि कृत्य  करण्याची संधी मिळाली नाही.