Breaking News

हजरत मोहम्मद पैगंबर यांचेबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणार्‍या आरोपीला अटक करा!

बुलडाणा, दि. 25, सप्टेंबर - इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर यांचेबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करुन त्यांचा अपमान हॉट्सअ‍ॅप व्हिडीओद्वारे सोनू डांगर  यांनी केला. यामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या असून आरोपी सोनू डांगर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करुन तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी  महाराष्ट्र मुस्लिम विकास परिषदेच्या वतीने मेहकर तहसिलदारांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. 
सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, व्हॉटस्अ‍ॅपवर व्हिडीओ व्हायरल करणारी सदर महिला ही गुजरात राजयातील राजकोट येथील रहिवासी असून तिने  मुस्लिम धर्माचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर आणि अल्लाहबाबत अतिशय आपत्तीजनक विधाने करुन मुस्लिम धर्माच्या भावना दुखावून राष्ट्रीय एकात्मतेला  धोका निर्माण केला आहे. तसेच दुसर्‍या व्हिडीओमध्ये मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश पाठवित आहे. 2002 ला तुम्ही गुजरातमध्ये दंगल घडविल्याप्रमाणे दोन  दिवसांसाठी काश्मीर घाटीला सुद्धा गुजरात करुन टाका, अशी विधाने करुन भारत देशाच्या विरोधात आपत्तीजनक वक्तव्य केले आहे. तरी गुजरातमधील राजकोट  येथील रहिवासी असलेल्या सोनु डांगर हिने इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत आणि अल्लाहबाबत आपत्तीजनक विधान करुन अपमानीत  केले आहे. तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काश्मीर घाटीत दंगल घडविण्याबाबत संदेश पाठविल्याप्रकरणी सोनु डांगरच्या विरोधात तात्काळ गुन्हा दाखल  करुन अटक करावी आणि या प्रकाराचा तपास संपूर्ण पोलिस विभागाला द्यावा, अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र मुस्लिम विकास परिषदेचे तालुकाध्यक्ष अशफाक  शहा, इसाक शहा, शहराध्यक्ष रहेमान खान रियासत खान, शेख रफिक शेख इसा, अफरोज शहा, जलाल कुरेशी, गुलाम मोहम्मद सबाउल्ला खान, सुमेर शहा  आदींनी तहसिलदार मेहकर यांना निवेदन देवून सदर आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.