Breaking News

पोलिस अधीक्षक कार्यालयात ई-कंम्प्लेंट कक्षाचे उद्घाटन

बुलडाणा, दि. 25, सप्टेंबर - बुलडाणा जिल्ह्यातील सामान्य नागरिकांच्या तक्रारींचे पोलिस प्रशासनाकडून जलदगतीने निराकरण होवून संबंधित दोषींवर तत्परतेने  कार्यवाही होण्यासाठी पोलिस अधीक्षक कार्यालय, बुलडाणा येथे 23 सप्टेंबर रोजी पोलिस अधीक्षक शशिकुमार मीना यांच्या हस्ते ऑनलाईन ई-कंम्प्लेंट कक्षाचे  उद्घाटन करण्यात आले आहे. यापूर्वी तक्रार अर्जदार त्यांची तक्रार लेखी अर्जाद्वारे पोलिस अधीक्षक कार्यालयात येवून दाखल करीत होते. ती तक्रार कार्यालयातील  आवक शाखेतून सर्व औपचारिकता पार पारडून वरिष्ठ पोलिस अधीक्षक यांच्या निदर्शनास येत होती. 
परंतु सामान्य नागरिकांना त्यांच्या तक्रारीचे निवारण जलद गतीने होण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून लोकाभिमुख सेवा प्रदान करण्यासाठी पोलिस अधीक्षक  कार्यालयात यापुढे ऑनलाईन ई-कंम्प्लेंट स्वीकारण्यात येणार असून नागरिकांनी आपल्या तक्रारी ऑनलाईन कंम्प्लेंटच्या माध्यमातून तोंडी अथवा लेखी तक्रार  पोलिस अधीक्षक कार्यालयातील ई-कंम्प्लेंट कक्षात दाखल करता येणार आहे. या कक्षाच्या उद्घाटनप्रसंगी अपर पोलिस अधीक्षक संदीप डोईफोडे, पोलिस  उपअधीक्षक(गृह) टी.टी.इंगळे, पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे, पोलिस निरीक्षक सातपुते, सपोनि मनोज केदारे आदींची उपस्थिती होती.