Breaking News

चार टक्केच महागाई भत्ता दिल्याने कर्मचारी मध्यवर्ती संघटनेतर्फे निषेध

नाशिक, दि. 23, सप्टेंबर - राज्य शासनाच्या कर्मचार्‍यांना सात ऐवजी चार टक्केच महागाई भत्ता देण्याचे आदेश शासनाने दिल्याने राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती  संघटनेतर्फे निषेध करण्यात आला आहे.यासंदर्भात दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, राज्य सरकारी , जिल्हा परिषद व निमसरकारी कर्मचार्‍यांना  सरकारनेसात टक्के महागाई भत्ता देय असतांना केवळ चार टक्केच भत्ता देऊन कर्मचार्‍यांची बोळवण केली आहे.शासनाच्या या निर्णयाचा सरकारी कर्मचारी मध्यवर्ती  संघटने तर्फे निषेध करण्यात येत असल्याचे संघटनेचे कार्यध्यक्ष महेश आव्हाड,अध्यक्ष दिलीप थेटे,सरचिटणीस सुनंदा जरांडे,व बाबा गांगुर्डे यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे  कळविले आहे.