Breaking News

राज्य स्तरीय शालेय नेहरु हॉकी स्पर्धेत ‘क्रीडा प्रबोधिनी संघ’ विजयी

मुंबई,, दि. 23, सप्टेंबर - बालेवाडी येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय शालेय नेहरू हॉकी स्पर्धेत क्रीडा प्रबोधिनीच्या संघांनी मुले आणि मुली अशा दोन्ही गटांचे  विजेतेपद पटकावले . क्रीडा प्रबोधिनीच्या मुलींच्या संघांतील ऋतुजा पिसाळ आणि वैष्णवी फाळके यांनी प्रत्येकी 3 गोल केले. क्रीडा व युवक सेवा संचालनालय ,  जिल्हा क्रीडा परिषद पुणे, हॉकी महाराष्ट्र यांच्या द्वारे 20 ते 22 सप्टेंबर या कालावधीत राज्यस्तरीय शालेय नेहरु हॉकी क्रीडा स्पर्धेचे ( 15 वर्षाखालील मुले, 17  वर्षाखालील मुले व मुली) आयोजन करण्यात आले होते.सदर स्पर्धेत एकूण आठ विभागीय संघ व क्रीडा प्रबोधिनी असे एकूण 9 संघातून 375 ते 400 खेळाडू  सहभागी झाले होते, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान यांनी दिली.