Breaking News

सत्कार न स्वीकारता भाऊसाहेब रंगारी गणपतीला निरोप

पुणे, दि. 06, सप्टेंबर - प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपतीची रात्री उशिरा सुरु झालेली मिरवणूक आज सकाळपर्यंत सुरू होती. पुण्यातील रस्त्यांवर बप्पाच्या  स्वागतासाठी सुबक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. आज सकाळी मोठ्या थाटात दगडूशेटचे विसर्जन करण्यात आले. पुण्याचे ग्रामदैवत अर्थात पहिला मानाचा  कसबा गणपतीचे काल 4 वाजता विसर्जन करण्यात आले होते. त्यानंतर इतर चारही मानाच्या गणपतींना निरोप देण्यात आला.दरम्यान, महानगर नगरपालिकेचा  सत्कार न स्विकारता भाऊसाहेब रंगारी मंडळाच्या गणपतीची विसर्जन करण्यात आले. गणपती बसवण्यास सुरूवात कोणी केली यावरून वाद सुरू आहे. यामुळेच  रंगारी मंडळाने महानगरपालिकेचा सत्कार न स्विकारता गणपतीचे विसर्जन केले.यंदा पुण्यात गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवानिमित्त जोरदार तयारी करण्यात  आली होती. पालकमंत्री, महापौरांच्या हस्ते पूजा झाल्यानंतर मानाच्या गणपतींच्या मिरवणुकीला सुरवात झाली. सुरेश कलमाडीही मिरवणुकीत सहभागी झाले होते.