देव द्या, देवपण घ्या उपक्रमांर्तगत 14 हजार 433 गणेश मूर्तीचे संकलन
नाशिक, दि. 06, सप्टेंबर - गणेश विसर्जनाच्या निमित्ताने चोपडा लाँन्सजवळील गोदापार्क येथे शहरातील सुमारे 14,433 भाविकांनी गणेशमूर्ती दान दिल्याची माहिती विद्यार्थी कृती समितीचे अध्यक्ष आकाश पगार यांनी दिली.
प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती, रासायनिक रंगकाम व इतर सौंदर्यप्रसाधने व निर्माल्यामुळे गोदावरीचे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते. त्यामुळे विद्यार्थी कृती समिती तर्फे गेल्या 7 वर्षांपासून देव द्या, देवपण घ्या हा उपक्रम राबविण्यात येतो. गणेशोत्सवातील 10 दिवस सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे व घरोघरी जाऊन विद्यार्थी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी जनजागृती करणारे पत्रके घराघरात वाटली होती. तसेच सोशल मिडियाच्या माध्यमातून देखील प्रभावी प्रचार तसेच आवाहन करण्यात आले होते. नाशिकच्या गोदाप्रेमी भाविकांनी या आवाहनाला भरभरून पाठिंबा दिला.
विसर्जनाच्या दिवशी सकाळी 10 वाजेपासूनच विद्यार्थी कृती समितीचे सुमारे 300 कार्यकर्ते चोपडा लाँन्सजवळील गोदापार्कच्या प्रवेशद्वाराजवळ तयार करण्यात आलेल्या मूर्ती संकलन केंद्रावर गणेशमूर्ती दान करण्याचे आवाहन करीत होते. पिवळ्या रंगाचे विद्यार्थी कृती समितीच्या नावाचे आकर्षक टी-शर्ट घातलेले हे कार्यकर्ते नाशिककरांचे लक्ष वेधून घेत होते.
यावेळी लहानग्यांपासून ते वयोवृद्ध नागरिक मोठया संख्येने गणेश मूर्ती दान करत होते. 6 फुटापेक्षा जास्त उंचीच्या विविध मंडळाच्या व घरगुती गणेशोत्सवातील मूर्ती यावेळी दान करण्यात आल्या. या मुर्ती अत्यंत भावपूर्ण वातावरणात महानगरपालिकेकडे सुपूर्द करण्यात येत होत्या.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आकाश पगार, विशाल गांगुर्डे, जयंत सोनवणे, रोहित कळमकर, राहुल मकवाना, सागर बाविस्कर, प्रशांत खडालकर, कोमल कुरकुरे, संकेत वानखेडे, सिद्धांत आमले, अभिजित पाटील, युवराज कुरकुरे, मयूर पवार, राकेश ठुबे, प्रितीश कारे, अविनाश बरबड़े, भावेश पवार, साईराज निकम, सचिन पवार, दीपाली जाधव, दिपाली यशोद, रोहिणी सोनवणे, स्नेहा पवार, हर्षदा राजभोज, भाग्यश्री सोनवणे, सोनाली सोनवणे, श्रद्धा पाटील, ऐश्वर्या लोळे, काजल वाघ, प्राजक्ता पाटील,नुपूर भुजबळ, तेजस्विनी आंबेकर, शुभांगी संत, भक्ती शाळाने, राजश्री शिंदे, विनिता पाटील, अश्विनी कुमावत, जाणावी गुप्ता, मानसी ब्राम्हणकर, आदींनी परिश्रम घेतले.