Breaking News

‘वीज वितरण’ची साडेपाच लाखांची फसवणूक

अहमदनगर, दि. 22, सप्टेंबर - स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वीज मंडळाची सुमारे साडेपाच लाख रुपयांची फसवणूक केल्यााप्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात  योगेश मॅकॉल (रा. श्रमिकनगर, पाईपलाईन रस्ता,नगर व त्यांचे कामगार)यांचेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वीज वितरण  कंपनीच्या सहायक लेखापाल  मिरा भागीनाथ वाघमारे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्0या माहितीनुसार 1 जानेवारी 2017 ते 20 सप्टेंबर 2017 या दरम्यान विज वितरण कंपनीचे  बेलवंडी उपविभागातंर्गत बेलवंडी, कोळगाव,मढे0वडगाव,पारगाव या शाखांमधील 54 गावातील ग्राहकांकडे योगेश व त्यांच्या कामगारांनी कमी युनीट टाकलेली संशयीत  घरगुती वाणिज्य ग्राहकाचे मीटर रीडींगची तुलना केल्यावर आरोपींनी त्यांनी त्यांच्या फायद्यासाठी एजन्सी ग्राहकास 44हजार 755 युनीट कमी टाकल्याचे निदर्शनास   आले त्यातून महावितरणचे 5 लाख 44 हजार 586 रुपये चे नुकसान केले आहे. म्हणून संबंधिताविरुद्ध फिर्याद देणयात आली  आहे. तपास बेलवंडी पोलीस करीत   आहेत.
बुलेट मोटारसायकल चोरी
संगमनेर - राहत्या घरासमोर लावलेली 90 हजार रुपये किंमतीची बुलेट (क्रमांक-एमएच-17 बी.पी.5198) ही मोटारसायकल चोरटयाने लांबविली.
12 ते 13 सप्टेंबर दरम्यान ही घटना घडली. या प्रकरणी संगमनेर पोलिसांनी सतीश हरिश्‍चंद्र वेरेकर (रा. गणेश कॉलनी, संगमनेर) यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा  दाखल केला आहे.
मोबाईलची चोरी
कोपरगाव- गांधीनगर  भागात राहणारे अहमद शफी शेख (वय-30 ) यांचा व त्यांचे दोन भाऊ यांचे तीन मोबाईल 23 हजार 200 रुपयांचे किंमतीच
कोणीतरी भामट्याने लंपास केले. याप्रकरणी कोपरगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
लाकडी दांडक्याने मारहाण
अहमदनगर- मुलीस मारहाण का करता ?असे विचारल्याचा राग येऊन चौघांनी महिलेस बेदम मारहाण करून लाकडी दांडक्यानेही मारहाण केली. या प्रकरणी  एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छाया शंकर बोरसे (वय-39रा. वडगाव गुप्ता, ता. नगर)यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी  फिर्यादीचे मुलीस मारहाण करीत होते, त्यावर आपल्या मुलीस का मारता असे विचारले असता आरोपींनी छाया हिला लाथा बुक्कयाने मारहाण करीत नंतर लाकडी  दांडक्याने बेदम मारहाण केली. पोलिसांनी लक्ष्मण मारूती निकम, कमल लक्ष्मण निकम,मारूती दगडू निकम, धुरपदा मारूती निकम यांचेविरुद्ध गुन्हा दाखल केला  आहे.
लोंखडी पाईपने मारहाण
अहमदनगर- मागील भांडणाचे कारणावरून अम्मी सुझान वॉलीन (वय-58.रा.अरणगाव) यांना तराना जगदीश सिंह (रा. अरणगाव ) हिने पाठीवर लोंखडी पाईपाने  मारहाण करून जखमी केले तसेच अम्णी हिचा पाळीव घोडाही मारून टाकीन अशी धमकी दिली. दुसरी फिर्याद तराना जगदिश सिंह (वय-37 रा. अरणगाव) हिने  फिर्याद दिली असून अम्मी सुझान वॉलीन हिने बिल्डिंगसमोरील सामाईक लाकडी दरवाज्या बंद करून बाहेर जाण्यास प्रतिबंध केला असे त्यात म्हटले  आहे.पोलिसांनी  गुन्हा दाखल केला आहे.
मोकळ्या जागेत डुकरे सोडल्याबद्दल गुन्हा
अहमदनगर - विनापरवाना डुकरे पाळून ती सार्वजनिक जागेत मोेकळी सोडून तेथे राहणार्‍या नागरिकांचे जिवीतास व आरोग्यास धोकादायक असलेला संसर्ग  पसरण्याचा संभव निर्माण झाला आहे. नागरिकांनी सदर डुकरांमुळे वाहन धारकास अडथळा व  उपद्रव निर्माण झाला असल्याच्या तक्रारीवरून उद्धव गोविंद म्हसे  (रा.पाईपलाईन रोड, नगर) यांनीं फिर्याद दिली. त्यावरून तोफखाना पोलिसांनी रमेश धोंडे (पूर्ण नाव माहीत नाहीत) याचेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.