Breaking News

राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या कामांसाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना

पुणे, दि. 22, सप्टेंबर - पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प सुरू आहेत. तर काही महामार्ग  भूसंपादनाअभावी रखडलेले आहेत. या प्रकल्पना गती मिळावी यासाठी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली आहे.  राष्ट्रीय महामार्गाचे पुणे विभागातील प्प्रकल्प, सुरू व्हावेत यासाठी प्रथमच अशा प्रकारे उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन  गडकरी यांच्या सूचनेनुसार भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पालकमंत्री बापट यांच्या अध्यक्षतेखाली 13 जणांची समिती स्थापन केली आहे.
यामध्ये विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, जिल्हाधिकारी सौरभ राव, राष्ट्रीय महामार्गचे प्रादेशिक अधिकारी राजीव सिन्हा, पुणे महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार,  पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, पुणे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, वन विभागाचे अधिकारी विवेक खांडेकर, सार्वजनिक बांधकाम पुणे विभागाचे  मुख्य अभियंता प्रवीण किडे, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ पुणे विभागाचे मुख्य अभियंता प्रशांत औटी, महावितरणचे मुख्य अभियंता एम. जी. शिंदे, नागनाथ  इरावडकर, राष्ट्रीय महामार्ग पुणे विभागाचे प्रकल्प संचालक एस. डी. चिटणीस आदींचा समावेश आहे.