Breaking News

पंढरपूर , सांगली ला पुराचा धोका ; उजनी - कोयनेतून मोठा विसर्ग

मुंबई, दि. 22, सप्टेंबर - उजनी धरणातून 80 हजार क्युसेक्स एवढ्या वेगाने भीमा नदीत विसर्ग होत असल्याने पंढरपूर शहराला पुराचा धोका निर्माण झाला आहे  . तसेच कोयना धरणातून 24 हजार क्युसेक्स एवढा विसर्ग चालू झाल्याने व या विसर्गात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याने तसेच चांदोली धरणातूनही  वारणेच्या विसर्ग चालू असल्याने सांगली शहरालाही पुराचा धोका संभवू शकतो, असे सांगण्यात येत आहे .
पुणे जिल्ह्यातील भाटघर , वीर धरणातूनही नीरा नदीमध्ये मोठा विसर्ग चालू आहे . नीरा नदीचे पाणी भीमेत मिळत असल्याने पंढरपूरला पुराचा धोका संभवू शकतो.