Breaking News

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदासाठी परिक्षा

औरंगाबाद, दि. 22, सप्टेंबर - महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत औरंगाबाद जिल्हा केंद्रावर दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट-क मुख्य परीक्षा 2017  रविवार दि. 24 सप्टेंबर 2017 रोजी दोन सत्रात घेण्यात येणार आहे. शहरातील शासकीय ज्ञान-विज्ञान महाविद्यालय, शासकीय सुभेदारी विश्रामगृहाजवळ,  विश्‍वासनगर व डॉ. रफिक झकेरिया कॉलेज फॉर वुमेन, नवखंडा, ज्युबली पार्क या दोन उपकेंद्रावर घेण्यात येणार असून पहिले सत्र सकाळी 10-30 ते 12 आणि  दुसरे सत्र 1-30 ते 3 या कालावधीत संपन्न होईल, असे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्रसिद्धी पत्राद्वारे कळविण्यात आले आहे. या परीक्षेसाठी 696 उमेदवारांना  प्रवेशपत्रे पाठविण्यात आली असून, या परीक्षेच्या कामासाठी 70 अधिकारी/कर्मचारी यांची
नियुक्ती करण्यात आली आहे. परीक्षा कक्षात प्रवेश मिळविण्यासाठी उमेदवारांने आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड किंवा स्मार्ट कार्ड प्रकारचे ड्रायव्हींग  लायसन्स यापैकी किमान कोणतेही एक ओळखपत्र व त्यांची छायांकित प्रत सोबत आणणे अनिवार्य आहे. असे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्रसिद्धी पत्राद्वारे  कळविण्यात आले.