Breaking News

स्वतंत्र मराठवाडा मागणा-या जनता विकास परिषदेतच फुट

नांदेड, दि. 21, सप्टेंबर - स्वतंत्र मराठवाड्याची मागणी करणे ही वैचारिक दिवाळखोरी असून त्याला आपला विरोध असल्याचे मत मराठवाडा जनता विकास  परिषदेच्या पदाधिकार्यांनी जाहिर केले असून या मुळे मराठवाडा विकास परिषदेतच स्वतंत्र मराठवाडा विषयावर एकमत नसल्याचे उघड झाले आहे.या वरून या  परिषदेत फुट पडल्याचे निदर्शनास येते. 
मराठवाडा जनता विकास परिषदेच्या अ‍ॅड़ प्रदीप देशमुख यांनी स्वतंत्र मराठवाड्याची मागणी केली होती़ मात्र याला चार ठराविका लोंकशिवाय कुणाचा पाठिंबा  मिळाला नव्हता एकदा या मागणीसाठी अयोजित कार्यक्रमात .मराठवाडया बाहेरून पाठिंबा मिळविण्यासाठी नागपुरचे वकिल आणे यांना पाचारण करण्यात आले होते  तेंव्हा शिवसैनिकांनी आणेंच्या गाडीवर दगडफेक केल्याने त्यांना पळून जावे लागले होते. आतापर्यंत हा विरोध परिषदेच्या बाहेरून होता आता मात्र परिषदेतून जेष्ठ  कार्यकर्त्यांनी स्वतंत्र मराठवाडयाच्या मागणीला तीव्र शब्दात विरोध केला आहे.
परिषदेचे माजी उपाध्यक्ष सदाशिवराव पाटील, माजी खा़सदार डॉ़व्यंकटेश काब्दे यांनी सदर मागणी वैचारिक दिवाळखोरी असल्याचे म्हटले आहे.स्वामी रामानंद तीर्थ  आणि गोविंदभाई श्रॉफ यांनी जे संपूर्ण, समृद्ध महाराष्ट्राचे स्वप्न पाहिले होते ते मराठवाडयाचा विकास करून पुर्ण केले पाहिजे असे ते म्हणाले.