Breaking News

निर्भय, मुक्त व शांततामय वातावरणात ग्रामपंचायत निवडणुका पार पाडा

औरंगाबाद, दि. 21, सप्टेंबर - लोकसभा, विधानसभा निवडणुकीप्रमाणेच होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुका निर्भय, मुक्त आणि शांततामय, पारदर्शक  वातावरणात पार पाडाव्यात, अशा सूचना राज्य निवडणूक आयुक्त ज.स. सहारिया यांनी अधिकार्‍यांना केल्या.
विभागीय आयुक्त कार्यालयात ग्रामपंचायत निवडणुकीबाबत औरंगाबाद, जालना जिल्ह्याच्या आढावा श्री. सहारिया यांनी घेतला. यावेळी ते बोलत होते. बैठकीस राज्य  निवडणूक आयोगाचे सचिव शेखर चन्ने, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, विशेष पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे, यांची उपस्थिती होती.