Breaking News

वैभव राऊत आत्महत्या प्रकरणी शिवसेना उपजिल्हा प्रमुखासह सहा जणांविरोधात गुन्हा

बीड, दि. 21, सप्टेंबर - म्हाळसजवळा येथील वैभव राऊत आत्महत्या प्रकरणी शिवसेना उपजिल्हा प्रमुखासह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. 
या बाबत माहिती अशी की वैभव याने काल शेतात जावुन आत्महत्त्या केली होती. वैभव याने पुर्वी मग्रारोहयोतील घोटाळा उघडकीस आणला होता. तसेच स्वतंत्र  पॅनल उभे करून निवडणूक लढवणार होता.निवडणूक लढवू नये म्हणून त्याच्यावर दबाव आणला जात होता. याचमुळे व्याजाने दिलेले पैसे परत करूनही त्याला त्रास  दिला जात होता. यामुळे त्याने आत्महत्त्या केल्याचे त्याच्या नातेवाईकांनी म्हटले असून काल अंदोलन केले होते.या प्रकरणी पोलिसांनी पिंपळनेर पोलीस ठाण्यात  शिवसेना उपजिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे ,हरिभाऊ खांडे, गणेश खांडे, नामदेव खांडे ,नगरसेवक संतोष गायकवाड, अमोल गायकवाड गुन्हा नोंदविण्यात आला.  आरोपी फरार आहेत.