Breaking News

आदित्य सचदेव हत्येप्रकरणी रॉकी यादव दोषी

पाटणा, दि. 01, सप्टेंबर - बिहारमधील आदित्य सचदेव हत्येप्रकरणी रॉकी यादव आणि त्याचे वडील बिंदी यादव यांना गया येथील अपर जिल्हा आणि सत्र  न्यायालयाने आज दोषी ठरविले. रॉकीसह अन्य तीन जणांनादेखील दोषी ठरविण्यात आले असून रॉकी विधान परिषद सदस्या मनोरमा देवी यांचा मुलगा आहे.
रॉकीला कलम 302 अंतर्गत दोषी ठरविण्यात आले असून या खटल्याची पुढील सुनावणी सहा सप्टेंबर रोजी होणार आहे.गाडीला ओव्हटेक केल्यामुळे रॉकीने  आदित्य सचदेव या तरुणाची गोळ्या झाडून हत्या केली होती. गया न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुऴे आनंद झाल्याचे आदित्यच्या कुटुंबीयांनी सांगितले.