Breaking News

गोरखपूरच्या बीआरडी वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्राचार्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

गोरखपूर, दि. 01, सप्टेंबर - उत्तर प्रदेशच्या बाबा राघव दास वैद्यकीय महाविद्यालयाचे निलंबित प्राचार्य डॉ. राजीव मिश्रा आणि त्यांची पत्नी पूर्णिमा शुक्ला यांना  गोरखपूर भ्रष्टचार विरोधी विशेष न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. मिश्रा आण्यिा पत्नीला उत्तर प्रदेशच्या विशेष तपास पथकाने काल  (मंगळवार) कानपूर येथून अटक केली होती. 
मिश्रा आणि रूग्णालयाच्या सहा कर्मचा-यांसह अन्य अधिका-यांविरोधात प्राथमिक माहिती अहवाल दाखल करण्यात आला होता. गोरखपूरच्या वैद्यकीय  महाविद्यालयात ऑक्सीजनअभावी गेल्या 48 तासांत 60 हून अधिक बालकांचा मृत्यू झाल्यानंतर मिश्रा आणि त्यांच्या पत्नीने पळ काढला होता. या दुर्घटनेनंतर  मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.