Breaking News

स्वित्झर्लंडच्या राष्ट्राध्यक्षा आजपासून तीन दिवसीय भारत दौ-यावर

नवी दिल्ली, दि. 01, सप्टेंबर - स्वित्झर्लंडच्या राष्ट्राध्यक्षा डोरिस लिउथर्ड यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रपती भवनात स्वागत केले. यावेळी राष्ट्रपती  रामनाथ कोविंद उपस्थित होते. लिउथर्ड या तीन दिवसीय भारत दौ-यावर असून दोन्ही देशांमधील गुंतवणूक, आर्थिक व्यवहार यांसारख्या विषयावर चर्चा होऊन  द्विपक्षीय संबंध दृढ करण्यावर भर दिला जाणार आहे. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी लिउथर्ड यांची भेट घेत काही महत्वाच्या विषयांवर चर्चा केली. भारत आणि  स्वित्झर्लंडमधील मैत्रीला 70 वर्ष पूर्ण झाल्यामुळे लिउथर्ड या दौ-यावर आल्या आहेत.