Breaking News

ठाण्यात तरुणीच्या साक्षीमुळे बलात्कारातील आरोपीची निर्दोष मुक्तता

ठाणे, दि. 22, सप्टेंबर - येथील 26 वर्षीय आरोपीची बलात्काराच्या आरोपातून निर्दोष मुक्तता झाली. अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप  त्याच्यावर करण्यात आला होता. आरोप केलेली तरुणी आणि आरोपी लग्नबंधनात अडकले असून ते सुखाने संसार करत आहेत असे न्यायालयात सिद्ध झाल्याने  न्यायालयाने आरोपीची सुटका केली.
2013 मध्ये 17 वर्षीय तरुणीचे अपहरण करुन बलात्कार केला असा आरोप 22 वर्षीय तरुणावर करण्यात आला होता. मात्र बचावपक्ष अपहरण, बलात्कार आणि  पोक्सो अंतर्गत येणारे आरोप सिद्ध करण्यास अयशस्वी ठरल्याचे न्यायमूर्ती ए. एस भैसरे यांनी यावेळी स्पष्ट केले.